STORYMIRROR

Sunita Patil

Romance

4  

Sunita Patil

Romance

पैंजण

पैंजण

1 min
431

सखे राणी बनुनी आलीस

झाले स्वप्न माझे गं साकार

तुझ्या अस्तित्वाची रुजवात

सुखावले सारे घरदार....१


काकंणांची होई किणकिण

साद दिली त्यास पैंजणांनी

चैतन्यमय वातावरणी

आलीस लक्ष्मीच्या पावलांनी...२


तुझ्या नाजूकशा पावलास

सखे खुलविते गं पैंजण

रुणझुणत्या या आवाजाने

वेडावते पहा माझे मन...३


चालतांना तुझ्या पावलांचा

होई आवाज नाद मधूर

छुन छुन अशी ऐकण्यास

कान होती माझे आतूर...४


निरोप सखे सांगून जाती

आवाज तुझ्या पैंजणांचा

रंगते स्वप्न डोळ्यात माझ्या

होतो आभास मिलनाचा...५


अशी नादमधुरता राणी

तुझ्या रूपी जीवनी रहावी

पैंजणांची रुणझुण साद

भोवताली माझ्या रेंगाळावी..६



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance