Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Salunke

Inspirational

3  

Umesh Salunke

Inspirational

बोलणं असावं न विसरणारं........!

बोलणं असावं न विसरणारं........!

1 min
302


बोलणं असावं न विसरणारं

भेटला तर स्मित हास्य करणारं

आठवणींच्या त्या घालवलेल्या

क्षणाला उजाळा देणारं.....!


बोलणं करावं पोरकं न होणारं

 जिव्हारी लागून मनाला न पटणारं

आपुलकी निर्माण करावी नातं विणणारं.....!


बोलणं करावं घरच्या रस्त्याने जाताना

पायाखालच्या जमिनीला कळून चुकावं

आज कुणाचं पावलाचं ओझं गेलं नसावं

कुणीतरी हाक मारावं

त्याच्यासोबत दोन

शब्द गोड बोलावं

आपल्या माघारी कुणीतरी सांगावं.....!


किती दिवसाचं आपलं आयुष्य असावं

 कधी कुणाच्या सोबत फ़िरलेलं असावं

कधी कुणाच्या सोबत चर्चेत असलेलं दिसावं

 कधी कुणाच्या हितगूज केलेलं ते कायम

 लक्ष वेधून घेणारं असावं.....!


 कुणाच्या बोलण्यावरून खतपाणी घालून

 विष कालवून आपल्याच नात्यात गालबोट

 लागणारं नसावं

आपलीच रक्ताची नाती टिकून

 राहावं इतकीच अपेक्षा आजच्या तरुण पिढीने

 करावं.....!


बोलणं असावं न विसरणारं

भेटला तर स्मित हास्य करणारं

आठवणींच्या त्या घालवलेल्या

क्षणाला उजाळा देणारं.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational