STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

1 min
261

क्रांतीसुर्याची क्रांतीज्योत

नमन तुला सावित्रीमाई

आमच्या शिक्षणासाठी

जन्मभर झटलीस आई


पतीव्रता तू आदर्श नारी

पतीस दिली सदैव साथ

स्त्रीशिक्षणाच्या धुरेसाठी

संकटावरही केलीस मात


दगडगोटे चिखलशेण

सोसलास यांचा मारा

चंदनासम तू झिजुनिया

गंधाळलास ज्ञानगाभारा


अबलांना देऊनी आधार

यशवंताची झालीस आई

पतीनंतरही कार्यधुरेसह  

लढा हा लढलीस गं माई


आदर्शावर टाकू पावले

स्वप्न तुझे करु गं साकार

शिक्षणाच्या गं बळावरच

नव्या पिढीला देऊ आकार!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational