नारी शक्ती
नारी शक्ती
रागिणी, रणरागिणी
नारी मी, नारायणी मी
दामिनी, सौदामिनी मी
न अबला, सबला मी
शिक्षणाची मनी आस
जरी दु:खाचे डोंगर
उत्कर्षाची धरी कास
पाहते लक्ष्य समोर
वाट, चाल भरभर
तू चढ उंच शिखर
स्त्री स्वांतत्र्याचा विचार
समानता हा निर्धार
सप्त गुणांचा हा वास
दया, क्षमा, शांती, प्रेम
वात्सल्य, पावित्र्य संग
मांगल्याची तव देण
उठ जागी हो सत्वर
होऊन आत्मनिर्भर
नारीशक्तीचा जागर
सामर्थ्यास नमस्कार
