STORYMIRROR

Daksha Pandit

Others

3  

Daksha Pandit

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
171

रक्षाबंधन हा | सण महत्त्वाचा|

विश्वास, प्रेमाचा| भावाप्रति ||१||


राखीपौर्णिमेचा | दिन हा पवित्र |

बांधे रक्षासूत्र| पावित्र्याचे ||२||


बहीण करते | भावाचे औक्षण |

करती रक्षण | एकमेका ||३||


नात्यांचा ऊत्सव |राखी करमुळी |

टीळा लावे भाळी |बहिण ती ||४||


बहीण भावाचे | नात हे अतूट|

असो एकजूट | दोघांमध्ये ||५||


नात हे दोघांचे | निर्मळ,निर्झर

प्रेमाचा पाझर |सदैवचि ||६||


रेशीम धाग्याचा | बंध हा नितळ |

देत असे बळ | दोघांनाही||७||


स्नेहरूपी राखी | अनोखे बंधन |

प्रेमाचे चंदन | जन्मांतरी||८||


Rate this content
Log in