STORYMIRROR

Daksha Pandit

Others

3  

Daksha Pandit

Others

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव

1 min
202

नवरात्रीची झाली सुरवात

शक्तीरूप दुर्गेच्या पूजनाने

शौर्य,धैर्याच्या नऊरूपांना

पुजूया आपण भक्तीभावाने....१


नवदुर्गेचे प्रथम शक्तीरूप 

शैलपुत्रीचे करूया पूजन

अरि संहार करू धैर्याने

शक्तीरूपास करू वंदन...२


महिषासुरमर्दिनी करते

राक्षसी वृत्तीचा नायनाट

शक्ती दुर्गेचे रूप घेऊनी

शोधूया मग प्रकाशवाट...३


शक्ती,संपत्ती करिता

पंचमीस देवीची उपासना

घारग्यांचा प्रसाद दावुनी

ललितादेवीची आराधना....४


महाअष्टमीला करूया

लक्ष्मी प्रतिमेस नमन

रात्री घागरी फुंकुनी

करूया देवीचे अर्चन....५


विजयादशमीला करते

चामुंडा वध महिषासुराचा

रावण-रामाच्या युध्दात

विजय झाला श्रीरामाचा....६


नवरात्रीचे आगमन होता

शक्तीरूप देवींना वंदन

शस्त्रांचे पूजन करूनी

दोषांचे होऊ दे सीमोलंघन....७


नवरात्रीत घेऊ वचन

काम,क्रोध,लोभाचे दमन

मद,मोह,मत्सराचे गमन

सुखशांतीचे होई आगमन....८


नवरात्रीला घरच्या स्त्रीच्या

भाव भावनांचे ठेवा भान

घराला उध्दारण्या स्त्रीचा

सकलांनी करावा सन्मान...०९


नवरात्री सण उत्साहाचा

स्नेह,आनंद वाटण्याचा

माणसाने माणसासम 

वागुनी माणुसकी जपण्याचा....१०


Rate this content
Log in