सरी शुचित्वाच्या
सरी शुचित्वाच्या
1 min
188
सण, उत्सवांनी
सजला महिना
श्रावणात करू
शिव आराधना...........🍃१🍂
इंद्रधनुष्याचा
नभात हिंदोळा
गगनात दिसे
मेघ हा सावळा...........🍂२🍃
सौंदर्याची दिसे
रम्य उधळण
सुगंधाची जणू
असे पखरण.............🍂३🍃
श्रावण मासात
डवरली फांदी
श्रावण सरींनी
समृध्दीची नांदी..........🍃४🍂
नागपंचमीला
नागाचे पूजन
प्राण्यातील ईशा
करूया वंदन...........🍂५🍃
स्वातंत्र्य दिनास
तिरंगा स्मरण
शपथ घेऊया
देशाचे रक्षण............🍃६🍂
आम्हा सकलांना
लुभवी श्रावण
सरी शुचित्वाच्या
सुखवी आंगण...........🍂७🍃
