मनातला श्रावण
मनातला श्रावण
श्रावण महोत्सव
नवनिर्मितिचे क्षण
मनी चैतन्य उधळण
आनंदाची साठवण..१
श्रावणाच्या स्वागतास
बहरली पर्णफुलांची फांदी
श्रावणातली हिरवळ,जणू
सुख समृध्दीची नांदी..२
मनभावन श्रावणाने
मनावर घातली फुंकर
नवनिर्मितेच्याआसेने
तरारले कोवळे अंकुर...३
श्रावणात श्रवणीय
गाभाऱ्यातला ओंकार
हिरव्या ,बरव्या ऋतूचा
स्रुजनशीलतेचा हुंकार..४
व्रतमास श्रावण येता
घरीदारी शुचित्वाचा वास
व्रतवैकल्ये करुनी ,ईश
समिप जाण्याची आस..५
श्रावण सोमवारी
शक्तीचे हे पूजन
उपवास करुनी
शंकरास नमन..६
मनातल्या श्रावणाचे
रूप भारी सोज्वळ
आनंदाच्या क्षणांनी
भरली माझी मनोंजळ..७
