स्वातंत्र्यवीर
स्वातंत्र्यवीर
स्वातंत्र्य लढ्याची|उडाली ठिणगी|
झाली खडाजंगी | ब्रिटीशांशी||१||
राष्ट्रावरी प्रेम | त्यजला संसार |
दूर घरदार | देशास्तव ||२||
देशाचे सुपुत्र| स्वातंत्र्याची आण |
गमावले प्राण | लढताना ||३||
ओठावरी त्यांच्या | नारा जयहिंद |
झालेत शहीद | देशासाठी ||४||
असंख्य वीरांचा |आम्हा अभिमान|
व्यर्थ बलिदान | नसो कधी ||५||
करूया स्मरण|घेऊया स्फुरण
फेडू आम्ही ऋण |कृतीतुनी||६||
