भारत देश माझा
भारत देश माझा
अमुची आन बाण शान भारत देश माझा
साऱ्या विश्वाच्या अभिमान भारत देश माझा
श्रद्धास्थान अमुचे कृष्ण, गौतम, पैगंबर
दिसती चोहीकडे मंदिर, मस्जीदी, विहारं
माणूसकीच शिकवतात धर्मग्रंथ सारे बायबल, गीता, कुराण भारत देश माझा
संतांनी शिकवली आम्हा जीवनाची महती
भाष्कराचार्यांनी दिली आम्हा ओळख गणिती
येथेच जन्मास आले चाणक्य विवेकानंद
विद्वानाचा आहे विद्वान भारत देश माझा
आहेत धर्म अनेक, भाषाही बहू अमुच्या
पोशाख विविधरंगी जशा छटा वसंताच्या
एका सुरात गाऊ राष्ट्रगान भारताचे
एकतेचे देतो प्रमाण भारत देश माझा
परकीय सत्तांची कित्येक झाली आक्रमणे
केले भूईसपाट सार्यांना क्रांतीकारकाने
राष्ट्राला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी
पुत्राचे देतो बलीदान भारत देश माझा
