STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

संत भगवान बाबा-सोहळा गीत.

संत भगवान बाबा-सोहळा गीत.

1 min
26.8K


भगवान बाबांच्या जयंतीला

भगवान गडाच्या तिर्थाला

जनसागर उसळला

सोहळा बाबांचा पाहण्याला


झाला आनंद मनाला

साऱ्या भक्त जनाला

भगवान बाबांच्या कार्याला

भगवान गडाच्या मातीला


भगवान बाबा प्रेरणा स्थान

समाजाचे श्रद्धास्थान

आदर्श संत जीवन

एकता ,समतेचे पवित्र स्थान


दैवत वंजारी समाजात

महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात

रुजविले विचार धन

जपले समाजबांधवांने


नव्हता लोभ धनाचा

नव्हता लोभ पदाचा

विचार थोर मनाचा

संत जीवन कार्याचा


सोसला वेळोवेळी अपमान

शब्द जहाल विषा समान

राखण सत्याची करून

सिद्ध केले संत मन


भगवान गडाच्या क्षेत्राला

टाळ मृदुंग वाजला

रामकृष्ण गजर झाला

पूजले बाबांच्या प्रतिमेला


दरवर्षी वारीला

बाबांच्या चरणाला

आशीर्वाद बाबांचा घेण्याला

शान गडाची राखण्याला


जपलय आदराने वास्तुला

पिढ्या पिढ्यांनी गडाला

समाज प्रबोधन करण्याला

विचार शुद्ध मनाला


संघर्ष जगताना झाला

पात्र झाले सत्व परीक्षेला

झाली तुमची अग्नी परीक्षा

महामानव थोर पुरुषा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational