STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

मित्रा

मित्रा

1 min
27.3K


मानतो आता कशाला हार मित्रा।

या जगाचा तूच हो आधार मित्रा।।


पावसाने रान सारे चिंब केले।

मान त्याचे खास तू आभार मित्रा।।


या जगाला पोसणे जर धर्म आहे।

घे तुझ्या डोई तयाचा भार मित्रा।।


ठेव आशेचा किरण तू तेवतांना।

अंतरीचा घालवी अंधार मित्रा।।


ठेवती वृद्धाश्रमाशी मायबापा।

जाहल्या संवेदनाही ठार मित्रा।।


निर्मितीचा मान देवासारखा तुज।

ठेव त्याची लाज तू साभार मित्रा।।


घे धडा पक्षा पशू पासून इतुका।

संकटा पुढती नको लाचार मित्रा।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational