सैनिक- कविता
सैनिक- कविता
माझ्या सैनिक राजा रे
जीव तुझा हातावर
जीवन तुझे हे खड़तर
देशाचा तू आधार
उन, पाऊसात, वाऱ्यात
कष्टतो देश राखण्यात
अहोरात्र तुम्ही कष्टात
जीवन देशासाठी अर्पित
तुझी चाल चौफेर
असते शत्रूकडे नजर
पार करतो मोठी शिखर
सामान रक्षणाचे पाठीवर
सोडून मायबाप लेकर
सोडून सारा संसार
तुझी सेवा आहे तत्पर
देशकार्य हे धुरंधर
रान, वन दाट झाडीतून
ओहोळ, नाले, हिम, डोंगरातून
फिरतो खड़तर प्रवासातून
संकटाना पार करुन
करतो देशाची सेवा
आत्मा ओतून भावा
निस्वार्थ नित्य जीवा
अहोरात्र जीवन मानवा
तुझे जगणे, मरण
नाही येणार सांगून
शत्रूशी लढून, लढून
नेतो जयाच्या छायेतून
करुन भारतमातेचे रक्षण
कधी फिरेना वळून
हे भारत मातेचे वचन
हाती तिरंगा धरून