STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

शिक्षक दिन.(गुरु गौरव दिन )

शिक्षक दिन.(गुरु गौरव दिन )

1 min
27.8K


आज या दिनाला

शुभ समयाला

वंदन करू या गुरुजनाला

शिष्यासाठी जीवन वाहिले


अगाध कार्य तुमचे जगाला

शांतीचा संदेश शिकविला

सर्वधर्माचा आदर राखला

निर्पेक्षप्रेम आपुलकीचे


दयाभाव आणि बंधुत्वाचे

माय भूमीचा सन्मान शिकविला

आदर्श नागरिक तुम्ही घडविला

तुमच्यामुळे मनोबल मिळाले

जनासाठी तुम्ही आयुष्य झिजले


तुमच्या शब्दाने प्रेरणा मिळाली

सत्यासाठी हिम्मत वाढली

शिकवण तुमची अगाध झाली

मायभूमीची महती शिकविली


मायभूमीचे ऋण समजाविले

देशरक्षणास रक्त स्फुरले

एकता ,अखंडता तुम्ही शिकविली

विश्व बंधुभाव जगास रुजविली


तुमच्या वाणीने जग जिंकले

जगण्याला आमच्या धैर्य मिळाले

तुमच्यामुळे परिवर्तन झाले

जगात तुम्ही प्रेरणा स्थान राहिले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational