STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन

1 min
27.8K


महाराष्ट्र मातीत मराठी जन्मली

मराठी मनाच्या अंगी भिनली

अशी आमची भाषा रसाळ बोली

मराठी माणसाच्या हृदयात वसली.

संत सज्जनात वाढू लागली

निसर्गाच्या सोबतीने खेळु लागली

शाळा, कॉलेजात घुमू लागली

जनजनासाठी मराठी कष्टली .

एक, एक अक्षराने समृद्ध झाली

शब्दा, शब्दाने शिकवू लागली

साऱ्या विश्वात शोभून दिसली

संस्कार जगास देण्यास पुढे आली.

आदर्श पिढ्या घडवू लागली

राज्य भाषा म्हणून ओळख पटली

युगे, युगे भाषा अमर झाली

जतन,साधू, संतानी आजवर केली.

प्रेम, बंधुभाव, विश्वात नांदली

मराठी मनाच्या रक्तात भिनली

मराठी भाषा गौरव कौतुके शोभली

महाराष्टाच्या चारी दिशात गर्जू लागली.

तिच्यासाठी संघर्ष तीव्र झाले

मराठी वीर धारातीर्थ पडले

त्यांच्या रक्ताने इतिहास घडला

मराठी बाणा जीवंत ठेवला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational