STORYMIRROR

Mohinee Gharpure

Inspirational

4  

Mohinee Gharpure

Inspirational

आजी म्हणायची..

आजी म्हणायची..

1 min
29.8K


मोत्यासारखं अक्षर हवं

आजी म्हणायची

जराजरी वळण बिघडलं

लग्गेच कशी रागवायची ..।


अक्षर म्हणजे आपल्या

स्वभावाचंच प्रतिबिंब

वळण त्याला म्हणून हवं

नीट काढ टिंब ...।


अ कसा वळणदार हवा

ह सुद्धा हवा सुंदर

कखगघ गिरवताना

वर्ष गेली झरझर ..।


लिहीता लिहीता मोठे झालो

आजीही नुरली या जगी

जाता जाता देऊन गेली

वळणदार अक्षरांची देणगी ..।


सुंदर अक्षर हाच खरा दागिना

पोरी तू लक्षात ठेव

आजीचे ते शब्दच घेतात

आता माझी नेहमी भेट ..।


आता कोणी लिहीत नाही

शुभ्र पांढऱ्या कागदांवर

टाईप करतात अक्षर अन् अक्षर

फटाफट पांढऱ्या स्क्रीनवर ..।


तेव्हा मला आठवते आजी

वाईटही वाटते अपरंपार

मोत्यासारखे अक्षर आता

मागे पडणार कालौघात ..।


दिसामाजी काहीतरी लिहू

वळणदार काढू अक्षरेही

हळुच तेव्हा शिरू कुशीत

आजीच्या आठवणीतही ..।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational