अशी स्वप्नरात्र
अशी स्वप्नरात्र
मनाच्या खोल तळाशी
आहे एक रात्र
आकाश सारं अंधारलेलं
सोबतीला चंद्र ..
पसरून साऱ्या चांदण्या तो
मस्त बसलाय निवांत
झाडांच्या फांद्यांमधून
बघतोय इथलं चित्र..
दूरवरच्या सूर्याची
जेव्हा येते हाक
आवरत आपला पसारा
चंद्र जातो ढगात..
अशी दिसावी पहाटवेळ
रात्रभर जागून
पुन्हा यावी अशी रात्र
आकाशवाटेवरून ..
