शिवरायांचा जयजयकार
शिवरायांचा जयजयकार
करतो तुझा जयजयकार
जय जय शिवाजी महाराज
थोर तुझी आहे पुण्याई
तुला वंदन करतो आज
१६३० या वर्षामध्ये
१९ फेब्रुवारीच्या रोजी
जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला
नाव ठेवले त्याचे शिवाजी
उपकार केलेत जिजाऊने अनंत
लाल महालाची केली निर्मिती
तिच्या डोळ्यांत दिसे नेहमी
सुव्यवस्थित स्वराज्याची आकृती
शिवबाला सांगितल्या नेहमी
तिने थोर पराक्रमाच्या कथा
त्यामुळे घडला वीर शिवाजी
तुझ्या चरणी टेकवतो माथा
जिजाऊ बलाढ्य सिंहीण
शिवबा तिचा छावा
संकटकाली आठवतो तू
करतो आम्ही तुझा धावा
धन्य तो शिवरायाचा आमचा
जिजाऊची नेहमी मानायचा आज्ञा
रायरेश्वराच्या मंदिरात केली
स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा
तोरणा जिंकून शिवरायाने
तोरण बांधले स्वराज्याचे
बघितले स्वप्न नेहमी त्याने
मराठ्यांच्या प्रभावी साम्राज्याचे
अफजलखानाचा करूनी वध
शायिस्तेखानाची छाटूनी बोटे
आमचा राजा आहे शिवराय
म्हणुनी आमचे भाग्य मोठे
वीर शिवाजी झाला राजा
शिवाजीचा राज्यभिषेक सोहळा
पाहिला जिजाऊ मातेने
याचि देही, याचि डोळा
देह त्यागुनी जरी निघाला
किर्ती दरवळते आसमंतात
तुझी थोरवी गातो आम्ही
सदैव आहेस तू स्मरणात
करू मानाचा मुजरा आपण
शिवरायाचे हिंदवी स्वराज्य
पुन्हा जन्म घ्या, राजे तुम्ही
स्थापण्याला सुव्यवस्थित राज्य
शिवबा, थोर तुझी किर्ती
तू होतास महान राजा
निरंतर गातो तुझे गोडवे
सदैव उतराई तुझी प्रजा
