STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3.1  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

सूर्य देवा-कविता

सूर्य देवा-कविता

1 min
32.2K


देवा हो देवा सूर्य देवा

सोनेरी किरणांचा देतोस ठेवा

पक्षी, प्राणी नमिती तुजला

उपकार तुझे रे पृथ्वी मातेला

पक्षांचे ते सुंदर गाणे

मोहून घेतात सप्तसुराने

देवा हो देवा सूर्य देवा


पक्षी, विमाने भ्रमण करती

सुंदर सकाळी उत्साही दिसती

तूच दाता, भाग्यविधाता

सृष्टीचा रे पालनकर्ता

देवा हो देवा सूर्य देवा


नव्या पिढीला तुझे आवाहन

आळस दया रे सारा झटकून

सौर उर्जेचा करावा आधार

उर्जेचा जपून करा वापर

देवा हो देवा सूर्य देवा


रवि राजा तू द्यावी शिकवण

सर्वांसाठी असावे सर्वजण

मुक्त करावे रोगराईतुन

सर्वाना आरोग्य मिळावे छान

देवा हो देवा सूर्य देवा


जगावर तुझे थोर उपकार

सुखी ठेवतो, लहान थोर

असे तुझे कार्य महान

मानवा तुझे नित्य स्मरण

देवा हो देवा सूर्य देवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational