STORYMIRROR

chhaya dabhade

Inspirational

4  

chhaya dabhade

Inspirational

बापाची महती

बापाची महती

1 min
28.4K



बापाची महती गाऊ कशी

कसा होता तो सांगताना

सात जन्मही पूरणार नाही

त्यांची महती गाताना


आयुष्य भर झिजले

चंदनापरी आमच्या साठी

दिला सूगंध आम्हाला

ताठ मानेने जगण्यासाठी


रोज आठवण येते

डोळयाची भरगच्च विहीर होते

आठवणी त्या आठवून मग

लपून, डोळे पुसून गप्प झोपी जाते


मी होते बापाच्या

काळजाचा तूकडा

पण बाप गेल्या वर

तोच तूकडा झाला पोरका


मी होते माझ्या बापासाठी

लक्ष्मी च स्थान

तूम्ही नाही तर म्हणून तर

मलासगळी कडे उजाड रान


वेदना ह्या असह्य

होत होत्या बापाला

पण त्या वाटून नव्हत्या

घेता येत त्यांच्या लेकीला


देवाला म्हणाले मी माझे

आयुष्य लाभो माझ्या बापाला

पण देवाने ऐकलं ते बापाच

माझे आयुष्य लाभो लेकीला


बापाची किम्मत ते

नसल्यावर कळते

पोरके पणाची जाणीव

माझ्या भोवती भिरभिरते


Rate this content
Log in

More marathi poem from chhaya dabhade

Similar marathi poem from Inspirational