STORYMIRROR

shilpaa jadhav

Inspirational

4  

shilpaa jadhav

Inspirational

मनातल्या उन्हात

मनातल्या उन्हात

1 min
29K


सूर्य मावळला झाली सांजवेळ..होईल

सुरू पून्हा सावल्यांचा खेळ,

दिवस-रात्र चे असेच सुरू राहतील चक्र

बदलत राहतील असेच ऋतू

असाच वाहत राहील वारा, पडतील अश्याच पावसाच्या धारा


गळून पडतील झाडांची पाने अन् पुन्हा नव्याने फुलतील

पिल्ले अशीच जातील उडून घरट्यातून आपले आकाश निर्माण करायला

अन् पुन्हा बांधतील घरटी नव्या पिल्लांना सांभाळायला

उगवेल अशीच कळी, फुलेल अन् सुकून जातील पाकळ्या

शेते अशीच बहरतील अन् सुरू राहील असाच पाखरांचा कालवा

नदिही तशीच मिळेल जाऊन समुद्राला


अन् बाष्प होऊन पुन्हा बरसेल नव्याने भेटायला

बदलत राहील सर्वकाही अन् नव्याने तेच घडत राहील पुन्हा पुन्हा

मी मात्र अजूनही तिथेच

मनातल्या उन्हात

सावलीच्या प्रतिक्षेत

अखंड.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational