STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

जंगलांची आम्ही लेकरे

जंगलांची आम्ही लेकरे

1 min
27K



जंगलांची आम्ही लेकरे

वनराईचा आम्हा आधार

प्राणी, पक्षांची सोबत

स्वच्छंदी जीवन जगण्यात

जंगल आमचा दाता

शेती आमची माता

हिरव्या सृष्टीची किमया

निळ्या आभाळाची माया

जगने मातीच्या कुशीत

झोपडीच्या आंनदी निवाऱ्यात

चित्ती लाभते सुख समाधान

चंद्र, ताऱ्यांच्या सोबतीनं

निसर्गाची करतो राखण

शुद्ध झाले पर्यावरण

मानवी जगण्याला आधार

श्रद्धा आमची जंगलावर

पोरे ,बायका राबे शेतात

गुराढोरांचे पालन जंगलात

पिढ्या, पिढ्यांची मेहनत

सुख आहे आमच्या कष्टात

नको घाव निसर्गावर

आमच्या जगण्याच्या हक्कावर

दुर्मिळ प्राणी, पक्षी होताय बेघर

निष्पापांच्या जगण्यावर

शिकून होणार आम्ही साक्षर

घाव घालू अंधश्रध्येवर

करू सारे हिरवे शिवार

माय मातीचे फेडू उपकार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational