STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

4  

गोविंद ठोंबरे

Inspirational

माझ्या देशा !

माझ्या देशा !

1 min
27.8K


थांब जरा माझ्या देशा तुला लई पुढं जायचंय
दाखल्यावरची जात काढून तुला धर्मनिरपेक्ष व्हायचंय
सर्वधर्म समभाव गिरवत तुला एकची धर्म बनायचंय
समतेची हाक देत आरक्षणाचं ओझं उतरायचंय

थांब जरा माझ्या देशा तुला प्रगतशील म्हणून घ्यायचंय
त्या आधी बेरोजगार तरुणाला कामधंद्याला लावायचंय
राजकारणाच्या दंशाचं जालीम औषध तुला शोधायचंय
तेव्हा खरं देशाचं तुला नेतृत्व म्हणून उभं रहायचंय

थांब जरा माझ्या देशा तुला देशभक्त लोकांचं व्हायचंय
सीमेवरच्या जावानाचं रोजचं मरणं थांबवायचंय
आतंकवादाच्या भौऱ्यातून बाहेर तुला पडायचंय
मग खऱ्या अर्थानं तुला अजय म्हणून संबोधायचंय

थांब जरा माझ्या देशा तुला भाग्यविधाता म्हणायचंय
त्या आधी लोकशाहीचं खरं रूप तुला दाखवायचंय
गरीब-श्रीमंतीचं अंतर तुला पार करून पुढं सरकायचंय
मग कुठे सुजलाम सुफलाम म्हणून छातीठोक सांगायचंय

थांब जरा माझ्या देशा तुला हरित देशा म्हणायचंय
रसायनानं माखलेल्या मातीचं दुखणं तुला सोसायचंय
पोशिंदा म्हणणाऱ्या माणसाचं तुला व्याज अजून फेडायचंय
अंधारलेल्या निसर्गाला प्रकाशमय करून दाखवायचंय

थांब जरा माझ्या देशा तुला एक संघ एक राष्ट्र व्हायचंय
विविधतेत एकता म्हणताना आतलं भांडण मिटवायचंय
देश एक अन प्रांत अनेक म्हणत राष्ट्रप्रेम रुजवायचंय
खऱ्या अर्थानं माझ्या देशा तुला अजून बरंच शिकायचंय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational