STORYMIRROR

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

3  

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

जागतिक मराठी दिन

जागतिक मराठी दिन

1 min
537


27 फेब्रुवारी दिवस सोन्याचा

जन्मदिवस आद्यकवी कुसुमाग्रजांचा

सोहळा जागतिक मराठी दिनाचा

ऐतिहासिक मराठीशाहीच्या गौरवाचा !!ध्रु!!


दऱ्याखोऱ्यात फळाफुलात वसते मराठी

सत्य अन न्यायासाठी लढते मराठी

मराठीच प्राण, मराठीच सन्मान

मराठीच जपते भूतदयेची जाण !! 1 !!


स्वर्गाभासम आनंद देइ मराठी भाषा

साहित्यातून फुलवी नवजीवनाची आशा

काय वर्णावे मराठी भाषा किती खास

लोखंडाचे सोने करणारा परीस !! 2 !!


मराठी भाषा पौराणिक आणि नवीपण

उपजले इथे अनेक लेखक अन कविजन

मराठी वाङ्मय असे नवरत्नाची खाण

मराठी भाषा संगोपनाचे असावे भान !! 3 !!


साहित्य मराठी मधुर सुगंधी फळाफुलासारखे, 

मैलभर सुगंध पसरविणाऱ्या कस्तुरीसारखे  

जात, कुळ, सीमा यांचे ना बंधन     

मातृभाषा मराठीस लक्ष लक्ष वंदन !! 4 !!


जोडते मराठी लाखोंची मने

शिकवते सर्वांना उन्नतीची गाणे

संस्कृती माणूसकीची इथेच जाण

कलागुणांना वाव अन मिळतो सन्मान !! 5 !!


इतिहास सोनेरी लिहिते मराठी

भविष्य सुखद घडविते मराठी

अन्यायाला वाचा फोडते मराठी

नाते आपलेपणाचे जोडते मराठी !! 6 !!


मराठी भाषेचे जतन आपण करू         

स्वर्गासम विकासाचा नाद धरू       

बोलणे मराठीत, मराठीत शिक्षण  

होईल जीवनाचे नंदनवन. !! 7 !!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్