STORYMIRROR

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

4  

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

कोरोना नक्कीच जाईल पळून

कोरोना नक्कीच जाईल पळून

1 min
390

हा हा म्हणता हाहाकार कसला झाला 

कोरोनाचा विषाणू कुठून कसा आला


विचार करण्यापेक्षा कुठून आला कसा

पाहूया पसरतो आणि थांबवायचा कसा


दिसायला कोरोना जरी असेल सूक्ष्मजीव 

करत नाही हा कोणाचीच कीव  


हस्तान्दोलन संपर्काने प्रसार याचा होई

एका रुग्णाकडून दुसऱ्याकडे झेप घेई


ताप, खोकला, श्वासाला त्रास लक्षण याचे  

महत्व जाना उपचारांपेक्षा प्रतिबंदाचे


लक्षण कोरोनाचे दिसता डॉक्टरांना भेटा

विचार नका करू आजार खरा कि खोटा  


तोंड, नाक, डोळे यांचा वारंवार स्पर्श टाळा

एकाच जागी जास्तजण नका होऊ गोळा  


निरजंतूकीकरणाने साबणाने वारंवर हाथ धुवा 

कोरोनाला रोखल्यास सर्वांची होईल वाहवा  


प्रसार रोखण्याची गरज ती खरी

किड्या मुंग्यासारखी माणस मरतील अन्यथा सारी


घरात राहुनी प्रसार थांबविणे उपाय हा खरा 

सरकारी सूचनांचे पालन तुम्ही करा


घाबरून नका जाऊ देव अजूनही आहे 

पण देवासारख्या माणसांना ओळखायचे आहे


घरातच राहून संपर्क एकमेकांचा टाळा  

शासनाचे अध्यादेश मनापासून पाळा


प्रयत्न जर केले सर्वांनी आपण मिळून  

कोरोना नक्कीच जाईल जगातून पळून


Rate this content
Log in