STORYMIRROR

Dr. Rajvardhan Deshmukh

Tragedy Others

4  

Dr. Rajvardhan Deshmukh

Tragedy Others

इतिहासात पहिल्यांदाच असे घडले...

इतिहासात पहिल्यांदाच असे घडले...

1 min
218

इतिहासात पहिल्यांदाच असे घडले 

घरात बंदिस्त राहुन जैविक युद्ध लढले

झाला होता सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रसार

बुद्धिमान माणूस मानेल कसली हार 


सरकारने सर्व बंदची पुकार केली

जनतेनी एकजुटीने साथ दिली

सर्व जातीधर्म आले एकत्र

महामारी विरोधी सुरु झाले सत्र


रोजगार धंदयाविना हात बंद पडले

उपासमारीचे संकट गगनाला भिडले

परी सोडली नाही माणुसकीची साथ

पोहचवले अन्नधान्य घराघरात


घरात बसून राहीले लहानथोर

रोखला कोरोना विषाणूचा प्रसार

डॉक्टर, नर्स, पोलीस लढले फार 

पुन्हा एकदा थांबवला मानवी संहार


एवढूसा विषाणू जगाला शिकवून गेला 

नाही महत्व शक्तीला नसे पैशाला 

अरे मानवा नको अतिउतावीळ होऊ 

पशुपक्षी, वनस्पती सर्व गुण्यागोविंदाने राहू

                    कवी: डॉ. राजवर्धन रमेश देशमूख


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy