निसर्ग कोपला तर...
निसर्ग कोपला तर...
1 min
1.2K
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला...
अतिवृष्टीचा झाला कोप
शेतीचा झाला हो खप
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला...
वणव्याचा झाला अतिरेक
हानी झाली हो नेक
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला...
प्रदूषणाचे आले भूत
आरोग्याचा करी हो घात
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला....
एड्सचा आला महाराक्षस
मानवा करण्या हो भक्ष्य
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला...
मानवतेची करा हो लागण
जीवन तुम्ही जगा सगुण
निसर्ग कोपला कोपला
मानव संपला संपला...
