STORYMIRROR

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

3  

Dr. Rajvardhan Deshmukh

Others

माझी ईश्वर प्रार्थना...

माझी ईश्वर प्रार्थना...

1 min
396

जय जय जगदगुरू  तुकोबाराय  

उभा केला तुम्ही वारकरी संप्रदाय 

श्वास आमुचा ईश्वराचे नामस्मरण

स्वर्ग आमुचा ईश्वराचे चरण  


निःस्वार्थ भक्ती, निःस्वार्थ सेवाभाव  

हृदयी वसे ईश्वराचा ठाव  

टाळ, मृदंग, वीणा घेऊनिया हाती 

मुखी ईश्वराचे गुण गाती...


ईश्वराची वारी पायी दिंडी चाले  

मुखी ईश्वराचे गुणगान बोले  

जगी उद्धार करण्या संतांचे जीवन 

पदोपदी करण्या माणुसकीची लागण...


ईश्वरा घरोघरी माणुसकी वसु दे  

प्रत्येकाच्या मनी आनंद हास्य असू दे 

हिच विनवणी तुझीया चरणी  

आनंदाने बहरू दे माय धरणी...


Rate this content
Log in