आम्ही साऱ्याजणी
आम्ही साऱ्याजणी
आम्ही साऱ्याजणी
आहोत खूपच गुणी
कुणी जिजाऊ कुणी लक्ष्मी
वसतो आम्ही साऱ्यांच्या मनी
कुणी अहिल्या कुणी सावित्री
साक्षर करू साऱ्या जननी
आम्ही साऱ्याजणी
आहोत खुपच गुणी
कुणी सुनिता कुणी कल्पना
आकाशाला घालू गवसणी
कुणी आशा कुणी लता
असती या तर स्वररागिणी
आम्ही साऱ्याजणी
आहोत खूपच गुणी
कुणी हिमा कुणी सिंधू
असती या रणरागिणी
कुणी रमा कुणी आनंदी
असती या तर स्वामिनी
