STORYMIRROR

Puja Jaju

Others

3  

Puja Jaju

Others

मीच माझ्या विश्वाची परी

मीच माझ्या विश्वाची परी

1 min
202

           

कशी गं तू इतकी खुळी , आमच्या घरात एक छोटीशी परी 


पुटू पुटू बोलणारी, दुडू दुडू धावणारी,

खोडकर ती सर्वांना इशाऱ्यावर नाचवणारी,

सर्वांची लाडकी ती सर्व काही मिळवणारी,

चंचल, अल्लड मनस्वी उधळणारी..


कशी गं तू इतकी खुळी, आमच्या घरात एक छोटीशी परी


हास्य तिचे ओघळते, हट्ट तिचे आगळेच,

मायेचा स्पर्श तिचा, नाद - छंद वेगळेच,

पायात फिरकी तिच्या, खुली तिला चौफेर,

विचारांचे उधाण, प्रश्नांचे ती भांडार..


कशी गं तू इतकी खुळी, मोठी झाली ईवलिशी परी


भातुकलीच्या खेळण्यांची मज्जा आता संपली,

तुरू तुरू पळणारे पाय आता दबकती,

 बोलताना का बरे शब्द आता रोखती, शब्द आता टोकती..


कशी गं तू इतकी खुळी , मोठी झाली ईवलिशी परी


स्वप्नं तिचे आभाळाचे, वाट तिची सैरभैर,

आवडे तिला उंच भरारी, ओढे तिला अस्तित्व,

वाट तिची निराळी, साथ सोडी आसमंत,

जीवनाचे उद्देश शिकवी तिला सारे जग, दाखवी तिला सारे जग..


कशी गं तू इतकी खुळी , दूर देशी उडाली ईवलिशी परी


रूप असावे सुंदर, सर्वगुण संपन्न,

पायात पैंजण, कंगनांची खणखण,

काल वेळ सर्व काही आता तिचे बदलले,

छंद नाद सर्व जणू नकळतच रुसले, नकळतच फुगले..


कशी गं तू इतकी खुळी, दूर देशी रमली ईवलिशी परी


नाही मला आवडे माझे असे वागणे, 

मोकळा श्वास हवा हेच माझे मागणे,

माझीही आवड आता कुणी तरी जपावी,

बैठकीत एक बैठक माझीही असावी, माझीही गिनावी..


कशी गं तू इतकी खुळी, दूर देशी रमली ईवलिशी परी


पुरे आता अपेक्षांचे अवजड भांडार,

माझ्यात आहे धमक, मीच माझी शिल्पकार,

माझ्या स्वप्नांची भरारी मीच आहे भरणार,

आज पासून मी आहे दिलखुलास जगणार, दिलखुलास वागणार..


कशी गं तू इतकी खुळी, मीच आहे माझ्या विश्वाची परी..

माझ्या विश्वाची परी.. 


Rate this content
Log in