यश...!
यश...!
यशाच्या साध्यासाठी
श्रमाची पेरणी करावी लागते
श्रमाच्या उभारणीवरच
यशाची तहान भागते...
तहान यशाची
जन्मभर अतृप्तच वाटते
जेव्हा खूप काही
यशासाठी करण्याचे बाकी राहाते...
यश दुधारी तलवार असते
त्याचे मोजमाप नियती ठरवते
नियतीच्या पुढे काही चालत नसते
म्हणून तर यश परावलंबी असते...
परावलंबत्वात यातना वसते
स्वावलंबाने ती दूर करावी लागते
जेव्हा यातना सारणे शक्य होते
तेव्हा कोठे यशाचे दर्शन घडते....!
सुप्रभात...!
