करार
करार
करूया करार । सोबत राहुया ।
कामं हो करूया । एकत्रित ।।
विश्वास ठेवूया । एकमेकांवरी ।
जगात रे भारी । बनूयात ।।
उद्योग करूया । पुढेच जाऊया ।
सोबत राहुया । सदाचिया ।।
प्रगतीचा ध्यास । कर्तव्याची आस ।
लाभो सहवास सदोदित
स्वावलंबी जगू मेहनत करू
उद्योग उभारू । चल मित्रा ।।
आव्हाने पेलूया हिंमतीने लढू
सदा मार्ग चढू यशाचा रे
करूया करार । बाणाही करारी ।
घेवूया भरारी । अवकाशी ।।