STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

यशोगाथा

यशोगाथा

1 min
317

ना वाजले जरी विजयाचे चौघडे

तरीही विजयपथावरती शिंपले रक्ताचे सडे

    अनेक अडथळ्यांचे काटेरी डोंगर चढले

    घायाळ पाऊले जाहली तरी कधी हसतही रडले

शिक्षणाच्या आवडीला जिद्दीने सवड काढली

लग्नानंतर दहावर्षांनी डिएडला मेरिटची गुणपत्रिका मिळवली

    सुरू झाला प्रवास मग यशाच्या दिशेने

   लागली चटक मग स्वप्न पूर्तीच्या आशेने

आवड सगळ्या कलांची ओसंडून वाहत होती

जपलीय आजतागायत जसा शिंपल्यातील गोड मोती

   गायन, नृत्य, रांगोळी वा असो पाककला

   खूप शिकण्यासारख्या अशा जोपासल्या अंगी विविध कला

आली अवचित वादळे यशमार्गासी अडवून धरले

पण दुर्दम्य इच्छा शक्तीनी सकारात्मक विचारसरणीने संकट हरले

   आयुष्याच्या यशाचे गमक लढल्याशिवाय हार मानू नये

   निरंतर प्रयत्नांची माणसाने कास काही केल्या सोडू नये 

वादळे, संकटे, अडथळे आपणास सलाखून काढतील

यशमार्गातील कठीण पायरी आपसूकच हिमतीने चढतील

    संघर्षाशिवाय यशाला माधुर्य येत नाही

संघर्षातील जखमा मग फारशा छळत नाही

    आपल्या यशाची व्याख्या आपल्या नजरेत पाहिजे

   इतरांच्या लेखी क्षुल्लक जरी तरी यशाची चव चाखलीच पाहिजे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational