STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

शांतीचा दूत

शांतीचा दूत

1 min
547

सत्य, अहिंसा शिकवण

  दिलीत तुम्ही

    महात्मा

    पदवी

 शांतीचा दूताची

येते सदैव आठवण......!!


लोकांना खेड्याकडे चला

   मंत्र  दिला

     स्वदेशी

     स्वराष्ट्र

   खादीचा वापर

करणारा माणूस भला.....!!


आंदोलन आणि सत्याग्रह

  चले जावचा

    नारा

    उपोषण

   करून फिरंग्यास

देश सोडण्याचा आग्रह....!!


मिठाचा सत्याग्रह नेला

   उचलले मुठभर

      मीठ

      दांडीयात्रा

    विदेशी वस्तूंचा

 बापूंनी बहिष्कार केला....!!


असहकार चळवळीत योगदान

   स्वच्छतेची कास

      धर्म

      जात

  विसरूनिया सारे

जोडले इतिहासाचे पान....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational