मकरसंक्रांत
मकरसंक्रांत
हा मकरसंक्रांत
सण मनामनात
भारतीय
स्त्रीया देवा अर्पिती
धान्याचे वाण देती
सुगडात
काळी साडी नेसती
दागिनेही घालती
आवडीने
घरोघरी ही घाई
हळदीकुंकू होई
सवाष्णींचे
सुखदुःखाचे क्षण
तिळगुळाचे कण
वाटुनिया
तिळगुळ महत्त्व
शरीरा मिळे सत्व
सर्वांनाच
कटुता सोडण्याचा
गंध हा गोडव्याचा
जिव्हाळ्याचा
