STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

भैय्या

भैय्या

1 min
439

रक्ताचा नसला तरी

रक्ताच्या पलिकडला,

अंगद भैय्या भाऊ एक

मज दैवाने लाभला...


पोरकी,एकाकी मी सदा

मनोमनी झुरत असे,

सणासुदीला उदास 

नैराश्य मनात वसे...


बंधूप्रेमाची कमतरता 

भरून अशी निघाली,

आयुष्याच्या ओंजळीत

सुखमौक्तीके जमली...


 आयुष्य हसले भैय्या

 तुझी साथ लाभली,

 राखीच्या धाग्यास

 हक्काची जागा मिळाली..


 मानलेलं नातं जरी

अंतरातूनी जपूया,

जीवनाच्या प्रवासात

एकमेकां साथ देऊया...


कर्तुत्ववान भाऊ माझा

ऊभा सदा खंबीरपणे,

मनाच्या कुपीत नातं

जपलंय मी विश्वासाने...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational