STORYMIRROR

Madhura Ghalke

Inspirational

3  

Madhura Ghalke

Inspirational

आरास

आरास

1 min
331

काळोखातून प्रकाशमयी

पणत्यांची रांग लागावी 

नैराश्यातून उजेडाकडे 

लुकलुकणारी वाट दिसावी 

शुद्ध विचारांची गाठभेट-

शुद्ध भावनांशी व्हावी

सकारात्मक प्रकाशाची

दूरवर लाट पसरावी 

अंधारातून एक किरण तेवत 

जीवनाला उजळत ठेवावी 

लहरावी ,झुलावी ही दिवाळी 

चमकताना प्रत्येकाच्या डोळ्यांतुनी दिसावी

हीच प्रार्थना एक रहावी 

जगण्यासाठी श्रीमंती असावी 

माणसांतल्या आपुलकीची, 

प्रेमाची अन  "माणुसकीची "  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational