STORYMIRROR

Madhura Ghalke

Others

3  

Madhura Ghalke

Others

रोजचीच पायवाट हरवून जाते

रोजचीच पायवाट हरवून जाते

1 min
203

थंडी म्हंटली की आठवतो तो गारठा ..

गारठणं म्हणजे काय हे गारठलेल्या पापणीच्या नजरेतून


ओळखीचा तू अनोळखी होऊन गेलास

रोजचाच तू पार बदलूनी गेलास

रुतलेल्या पावलांना पुसूनी टाक

काटे-कुटे दगड -धोंड्याची वाट 

नकाब गालिचा घालुनी तू 

शुभ्रतेचा पेहराव घातलास 

बघता बघता रोजचाच तू 

दृष्टीआड दिसेनासा झालास 

सामोरी उभी वाट पाहत तुझी 

तेजोमय किरणांनी कधी न्हाऊन निघशील

बहुरूपी मुखवट्याचे तेज पुसूनी

पुन्हा एकदा पूर्ववत होशील 

अनोळखी झालेला तू 

ओळखीचा होशील ना ?

पुन्हा एकदा....



Rate this content
Log in