STORYMIRROR

Madhura Ghalke

Romance

3  

Madhura Ghalke

Romance

बंध प्रेमाचे

बंध प्रेमाचे

1 min
280

सुरकुतलेले हात थरथरतच बांधत होते घट्ट वीण 

डोळ्यांखालची वर्तुळे नजरेतल्या प्रेमात लीन 

खूप लांबचा प्रवास करून झाला होता दोघांचा 

उसळलेल्या रक्तामधला संथपणा..... शांत बोलत होता 

आवड निवड स्वतःची असणारी सवय 

आता जपायला लागली होती त्याची अन तिची 

जखम झालीच त्याला तर 

खपली धरायला तिची फुंकर 

वेदना झाल्या तिच्या मनाला 

डोळ्यातल्या भावना त्याच्या सत्वर 

बोळक्या तोंडाने अर्धेमुर्धे शब्द 

न कळलेले ...तिला मात्र उमगायचे

त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांतल्या सहवासाने

मनातले गुपित मात्र त्याला -तिला कळायचे 

थकलेल्या शरीराला उठायला जमत नव्हते 

"मी आहे ना " म्हणून हात त्याचे आधार देत होते 

रिमझिमणाऱ्या छत्र्या आता 

एकसंघ झाल्या होत्या 

आधाराचा खांदा 

एकाच छत्रीत भिजत होता 

आजारपणाने त्रासलेले आयुष्य 

वीट आला होता सावरायचा 

पण माझ्याविना कोण तुला 

पुन्हा जगण्याचं बळ आणायचा 

धावपळीच्या आयुष्यात वेळ देणे राहूनच गेले 

आता मात्र रोज न चुकता 

एकाच काठीच्या आधारावर  

सांज सकाळ निसर्गाला भेट देऊ लागले 

पथ्यपाणी आले आता 

आहाराची अगदीच व्यथा 

तरी औषधही गोड लागे

एकमेकां घास भरवता 

 

रात्रीच्या प्रकाशाची डोळ्यांना ना सवय राहिली 

मेणबत्ती घरात आता मंद प्रकाश देऊ लागली 

रोज रोज नवीन डेट... त्या दोघांची 

कॅण्डल डिनर एकाच ताटात होऊ लागली

एकमेकांच्या सहवासात 

चांदण्याची रात्र झुलू लागली 

 

कधी मैत्रीचा कट्टा 

कधी मेहफिल चहाची 

जुन्या गोष्टींना पुन्हा उजाळा 

गाताना गझल आयुष्याची

गुंफूनि बोटांची पकड ,हात हात घेऊन 

दोघांचा जिव्हाळा मन यावे की भरून 

पिकलेल्या केसांनी ,थरथरलेल्या शरीरांनी 

जगण्याची उम्मीद एकमेकांच्या आधारानी

हरवतात दोघेही आठवून त्या आठवणी 

उबदार शालीत एकाच...

थंडीच्या गारठ्यातही


सुरकुतलेल्या रेषा अन खालावलेले डोळे 

निर्जीव झालेली शरीरं ,डोळ्यांखालची वर्तुळे 

प्रेम वाहते झऱ्यातुनी गुंतलेल्या मनात 

एकमेकांच्या डोळ्यांमधुनी नजरेतली दृष्टी सजीव

...नजरेतली दृष्टी सजीव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance