मनोरंग
मनोरंग
1 min
272
सरसर सरसर अंगावरती
कुठून आले रंगाचे वारे
भिजवुनि माझ्या तनामनाला
स्पर्शूनी गेले मन हे बावरे
छटा रंगीत …..
छटा रंगीत मिसळूनी मनांत
कुठला रंग तुझ्यामाझ्यात
कोठुनि बरे आला ,
कसा ओळखू मी सावरे ?
कसा ओळखू मी सावरे ?
हवेत भिरकुनी झाला रंगीत
फुललेला रंग आसमंताचा
निरभ्र ढगातील, नितळ मनांतील
इंद्रधनुष्य सप्तरंगाचा
असावा संस्कृती अन् परंपरेने
नटलेल्या शुभ्र विचारांचा
खुलले आकाशही
श्वासाश्वासांमधला दिवस हा…..रंगपंचमीचा