थेंबे थेंबे…..
थेंबे थेंबे…..
1 min
268
आठवणी तुझ्या - माझ्या मनातच दाटलेल्या
कडाडली वीज डोळ्यांतुनी बरसल्या
ढगामागुनी लपलेला .. .. ओघळलेला थेंब
हळूच झेलीत भूमातेची ओंजळ मातीत विरघळला
थेंब न थेंब
मृदगंध आठवणींचा चोहीकडे दरवळीत
झाडं झाडं शहारत पानं चोरून हसीत
निसर्गाचं मन आशेची पालवी बहरीत
न दिसे हा कुणास भिजत राहिला
चिंब ….
ओलाचिंब पाहिला हळूच फाटलेल्या
ढगाने आज तोही ओशाळला
तुझ्या - माझ्या आठवणीत
मनोमनी कोसळत…..बरसत
धो - धो पाऊस
