STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational

3  

Priti Dabade

Inspirational

आयुष्याच्या वळणावर

आयुष्याच्या वळणावर

1 min
410

दुसऱ्याच्या प्रगतीवर

जळायचे नसते

स्वकर्तुत्वाने पुढे

जायचे असते


कोणी पुढे गेले तर

पाय खेचायचा नसतो

चांगलं तेवढं घेऊन

विषय सोडायचा असतो


निराशावादी कधी 

व्हायचे नसते

आपली ताकद आपणच

ओळखायची असते


स्वतःची स्वतंत्र अशी

ओळख करायची असते

गुरुकिल्लीचा वापर करत 

पाऊल टाकायचे असते


खाचखळगे आले तर 

डगमगायचे नसते

परत उभा राहून नव्याने

सुरुवात करायची असते


नशिबाला दोष देत

बसायचे नसते

नशीब बदलवण्याची क्षमता

बाळगायची असते


काल काय झाले ह्याचा

विचार करायचा नसतो

आत्ताचा क्षण आनंदाने 

जगायचा असतो


अपयशाने कधीच

खचून जायचे नसते

यश खेचून आणण्याची

तयारी करायची असते


अवघड गोष्टी हाती घेऊन

पूर्ण करायच्या असतात

आयुष्यात नवनवीन 

आव्हाने पेलायची असतात


मनातल्या मनात 

कुढायचे नसते

आपल्या लोकांसमोर

व्यक्त व्हायचे असते


मदतीची गरज असेल तर

मागेपुढे पहायचे नसते

आपणहून वेळेला धावून

जायचे असते


व्यसनाच्या आहारी जाऊन

जीवन संपवायचे नसते

सत्कर्म करून समाधान 

मिळवायचे असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational