मृत्यू
मृत्यू
दे मृत्यूशी झुंज तू
हासून आनंदाने
कवटाळून टाक त्याला
विसरून भान सारे
मृत्यू हे आहे
त्रिकाल बाधित सत्य रे
क्षणभंगूर या जीवनाचे
गूढ तू जाणून घे रे
भयभीत होऊनी
हाटू नकोस पाठी
साठवुनी बळ पंखात
सज्ज हो घेण्यास झेप मोठी
उठवूनी टाक थरथराट
दृष्ट त्या काळाचा
घालवूनी भीती सारी
उगवेल सूर्य नव्या आनंदाचा
