जिद्द
जिद्द
मलाही आवडत स्वप्न बघायला
जिद्द उराशी बाळगून
आकाशात झेप घ्यायला.....
फक्त शांत बसून स्वप्न
घडत नसतात...
शेवटी मार्ग चालणाऱ्यालाही
प्रश्न पडतात.....
स्वतःची उत्तरं स्वतःच
शोधायची असतात....
यशाची शिखरे अशीच
पार करायची असतात..
शोधणाऱ्याला देवही
मिळून जातो...
मेहनत केली तर यशाचा
मार्गही मिळून जातो..
