लिही ना तूही
लिही ना तूही
तूही लिही ना काहीतरी माझ्यासाठी
मनातलं प्रेम ओठांवरती आणण्यासाठी
दाटलं आहे हृदयात तुझ्या ते
शब्द होऊन येउदे पानावरती
नको झुलवूस तू आता
प्रेम आणि मैतरीच्या झुल्यावरती
माझ्यासाठी हवेत मला
शब्द तुझे बोचरे...
ईशाऱ्यात हवे मला
मोर ते नाचरे
डोळ्यांच्या इशाऱ्यात हवी
साथ आयुष्यभराची
न सांगताच समजून जावीस तू
गोष्ट माझ्या प्रेमाची...

