STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Thriller

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Thriller

माझ्या राजाचा सण... शिवजयंती

माझ्या राजाचा सण... शिवजयंती

1 min
204

गलबत आल्यात गडाहून

लवकर यावं धावून.....


गडावं जाऊन करायचं र काय...


आरं 

कैवारी येतुया 33 कोटी देवाचा

बाप हुता तो मुघलाचा

दैवत आपुल्या हिंदूचा... र दैवत आपल्या हिंदूचा 


करूया तयारी जोमाची

साखर होणार आपल्या घामाची

पालखी येणार राजाची.....र पालखी येणार राजाची


कामावर सारे हटूया

हत्तीहून साखर वाटूया

आनंद जन्माचा लुटूया... र आनंद जन्माचा लुटूया


फुलांनी गडकोट सजवूया

 तोफांची इशारद आसमानी देऊया

राजा येणारय सांगूया.... र राजा येणारय सांगूया


नगाड ढोल ताशा वाजवूया

 गडकोट जित करूया

 स्वराज्याची आण वाहूया.... र स्वराज्याची आण वाहूया


आपल्यासाठी आनंद तो स्वर्गाचा 

शिवजन्म दिस हाय सोन्याचा

आता एक एक क्षण लय मोलाचा र... एक एक क्षण लय मोलाचा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy