STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance Action Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Romance Action Fantasy

तुझ्या देखण्या रुपाकडे पाहून

तुझ्या देखण्या रुपाकडे पाहून

1 min
206

सोनेरी तुझ्या केसांमध्ये

गुंतून मी बसलो

तुझ्या देखण्या रुपाकडे

पाहून मी फ़सलो...


देऊ चंद्राची उपमा तूला की

लिहू सूर्याची लालिमा तुझ्या गाली

हसरा चेहरा पाहून तुझा 

वाटते चांदण्यांची बरसात झाली


झालो वेडा तुझ्यासाठी नी

चातक मी बनलो

सोनेरी तुझ्या केसांमध्ये

गुंतून मी बसलो


देऊ इंद्रधनूची उपमा तूला की

लिहू पावसाची बरसात तू

कोकिळेच्या गाण्यासारखी

भासतेस गोड सारंगम तू


इंद्रधनूच्या रंगांमध्ये मी

पुरता रंगून बसलो

सोनेरी तुझ्या केसांमध्ये

गुंतून मी बसलो



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance