STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Abstract Fantasy Others

3  

shubham gawade Jadhav

Abstract Fantasy Others

निरोप

निरोप

1 min
209

उरी हुरहूर नीं काहूर माजल कशाला?

निघताना नको वाटणारा तो निरोप कशाला?


 जगतो मी सोडूनी काळीज गावी

ठेऊनी स्वप्नांची तीं वेडी चांदरात उशाला


आठवणींच सोडून गाठोडं

पाहतो मी तिकडे गाव माझं ज्या दिशेला


दाटून येतो कंठ, देतो डोळ्यात पाणी

पुन्हा न सोसणारा विरहाचा घाव कशाला?


अजूनही येतो मला दरवळ माझ्या गावचा

का ? येतो तो क्षण.. आणि हवा तो निरोप कशाला?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract