STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

शब्दसोबती

शब्दसोबती

1 min
446

शब्द तारी ,शब्द मारी,

शब्द अनेेका उद्धरी,

अन्यायाचा संहार करण्या,

अवतरे केसरी,


शब्दांचा प्रेमबाण,

 हृदयास लागे,

जाणिवेच्या स्पर्शाने,

गुंफतात धागे,


शब्दरूपी वचन,

बदलते आयुष्य,

व्यक्तत होई मन,

घडते रामायण,


साहित्याच्या जगातील,

शब्द आहे हिरा,

जसे पाडू पैलु,

घडतो तसतसा,


शब्दांची नौका,

भावनात तरंगतेे, 

भाषारूपी पाण्यात,

वाचेने वल्हवते,


विश्व हे सारेे व्यर्थ,

शब्दाविना भासे,

निश्चल जरी सर्व,

शेवटी...

     सोबती शब्द असे,

     सोबती शब्द असेे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational