स्वःआेळख
स्वःआेळख
स्वतःला आेळखा, टाकावे पुढे पाऊल,
नाही हाेत हुलकावणी, यशाची लागते चाहूल
स्वआेळखीसाठी आपली, जाणीव ती व्हावी,
अधिक स्वआेळखीसाठी, शिक्षणाची गंगा वहावी
सुप्त अंगभूत गुणांचा, घ्यावा आपण शाेध,
त्याचे करावे संवर्धन, घ्या त्यातून बाेध
आपल्यातील सर्वोत्तम गुणांचा, करावा आपण वापर,
पराकाेटीच्या समर्पणाने, गाठाल वैभवी यशाेशिखर
